webnovel

अशी तू-1

तो दिवस पण जरा निराळाच होता.त्या गाडीवरच्या फोटोला तू पहिला like केलेला.माहीत नव्हतं, तो प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचेल आणि ती मागची दृश्ये अजूनही मनात घर करून राहतील. हे सर्व आज लिहतोय खरं पण ह्या घटना ब-याच जुन्या आहे. हे सर्व लिहून मी जगासमोर अश्या शब्दांत मांडू इच्छितो की मी जितका तुला जाणतो, जितकं तुझ्यावर प्रेम करतो तितकचं जगाने तुला जाणावं. जगाच्या सफरीत एकट्या वाटेवरचा वाटसरू आहे मी. आणि त्या वाटेत मला भेटलीस तू. हमसफर!!! कसलाही प्रयत्न, इच्छा किंवा मागणी न करताच तू मला भेटलीस. तुझं माझ्या आयुष्यात असणं च माझ्यासाठी खुप आहे. भलेही दोघामधले शारीरिक अंतर खूप आहे पण मनाने खूप जवळ आहेस तू. शरीराचं काय ते दिवसागणिक बदलत असते, हे सर्वांना माहीत आहे पण प्रेम कधीच संपत नाही आणि बदलत ही नाही. तेच जीवनाचं अमृत आहे.आणि माझ्यासाठी तू ते आहे. जसा तुझ्यासाठी मी आहे.

@prathmesh_valmik.98